कामगार मंडळाने दक्षता पथकाच्या व तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार ठरवू नका. माहाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटेक

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

पाथरी तहसील कार्यालयात माहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दक्षता पथकाच्या व तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार ठरवू नका कर्मचारी, अधिकारी वर्गाला असल्यामुळे तो चुकीचा असल्यास त्याची नोंदणी नामंजूर केली जाते. त्यामुळे जर त्या कामगाराची नोंदणी संबंधित नोंदणी अधिकारी व कर्मचारी मंजूर करत असतील

त्यामध्ये कामगाराचा कोणत्याही प्रकारे दोष नाही. बांधकाम कामगार अधिनियम 1996 नुसार एखादा कामगार अपात्र वाटत असल्यास त्याला कायदेशीर नोटीस देऊन त्याचे म्हणणे ऐकून घेण्याचा व त्याला मंडळाच्या सचिवाकडे अपील करण्याचा अधिकार आहे. नोंदणी मंजूर करण्याचे व नाकारण्याचे अधिकार कर्मचारी, अधिकारी वर्गाला असल्यामुळे वामध्ये बांधकाम कामगार गुन्हेगार ठरू शकत नाही. बांधकाम कामगारांना अशाप्रकारे गुन्हेगार ठरवल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होत आहे.वरतू स्वरूपात वाटप करत असताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे अनेक वर्तमानपत्रात व कॅगच्या अहवालात स्पष्ट झालेले आहे. त्याचप्रमाणे मंडळाच्या सर्व कामासाठी खाजगीकरण करून सर्व कारभार कंपन्यांना सोपवला आहे. हे सर्व प्रकार बांधकाम कामगार अधिनियम 1996 च्या विरुद्ध आहे. करिता खालील मागण्या आपणास करण्यात येत आहे.

(१) दक्षता पथकाच्या व तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार, दोषी ठरवून, अपमानित करुन व पोलीस कारवाईची भीती दाखवून कामगारांचा छळ करण्यात येऊ नये.

(२) नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना असल्यामुळे व त्यांच्या सहकार्याशिवाय एजंट तयार होऊ शकत नसल्यामुळे सर्वसामान्य कामगारांना कोणत्याही प्रकारे गुन्हेगार ठरविण्यात येऊ नये.

(३) मालक आस्थापना व अभियंता कंत्राटदार यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर नोंदणी नूतनीकरण मंजूर केल्यानंतर पुन्हा त्यांना दोषी ठरविण्यात येऊ नये. त्याबाबत अर्ज मंजूर करते वेळीच अंतिम निर्णय घेतल्यामुळे त्यांना पुन्हा दोषी ठरविण्यात येऊ नये.

(४) बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांचे प्रमाणपत्र इतर राज्याप्रमाणे मान्य करण्यात यावे. त्यांना नोंदणी करण्याची स्वतंत्र सोय करून द्यावी.

(५) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर आयटक संघटनेच्या प्रतिनिधीची निवड करावी व मालक प्रतिनिधी देखील निवड करण्यात यावी.

(६) बांधकाम कामगार अधिनियमानुसार उपकर ज्याप्रमाणे अनिवार्यपणे जमा केला जातो त्याचप्रमाणे त्या कामावरील कामगारांची नोंदणी अनिवार्यपणे करावी व त्यांची कामगारांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देण्यात यावी.

त्यांना प्रमाणपत्र देणे बंधनकारक करावे. (७) शहरी भागात नाक्यांवर काम करणाऱ्या नाका कामगारांना नाका कामगार पुस्तिका देण्यातयावी. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार पुस्तिका देण्यात यावी.

(८) मंडळातील कंत्राटीकरण, खाजगीकरण, कंपनीकरण थांबवण्यात यावे.

(९)मगारांना वस्तू ऐवजी डीबीटी द्वारे त्याच्या बँक खात्यात लाभ वर्ग करण्यात यावा. वरील प्रमुख मागण्यांची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी याकरिता दिनांक 9 जुलै 2025 रोजी आयोजित धरणे, मोर्चे, निदर्शने करण्यात आले या आंदोलनात पाथरी तालुक्यातील व शहरातील अनेक बांधकाम कामगार व इतर कामगारांचे सहाकार्य करुन पाथरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आला आहे माहाराष्ट्र न्यूजला सब्सक्राइब करा शेर करा लाइक धन्यवाद

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल