स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
वीर वारकरी सेवा संघ परभणी महाराष्ट्र – राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र च्या वतीने देवशयनी आषाढी एकादशी आषाढी वारी व भगवा विठ्ठल पांडुरंग यांच्या जन्मोत्सव च्या निमित्ताने चंद्रभागा भीमा नदी व गोमाता नंदी महाराज वारकरी वासुदेव पूजन विविध सामाजिक सोहळा विविध महाजनजागृती अभियान उपक्रम राबविण्यात आला महा स्वच्छता अभियान महाआरोग्य तपासणी शिबिर प्रत्येक भक्तांनी तीर्थयात्रा करा महावक्ष लागवड व राज्य गोमाता गो संवर्धन दिन साजरा करा व फराळ वाटप हरिपाठाचे पुस्तक वाटप अशा अनेक उपक्रमाने मागील पाच वर्षापासून आषाढी वारी उत्सव साजरा करण्यात आला श्री पंढरपूर चंद्रभागा भीमा वाळवंट परिसर दिनांक पाच सहा सात आठ तीन दिवस दशमी एकादशी व द्वादशी यात तिथी नुसार विविध अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले याप्रसंगी आषाढी एकादशी वारी करणारे वारकरी गजानन वनगुजरे संजय लाटे उद्धव सुरवसे गजानन भोरकडे आयोजक महा जनजागृती अभियान प्रमुख तथा वीर वारकरी सेवा संघ परभणी अध्यक्ष अध्यक्ष वारकरी सेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांच्यासह वारकरी कीर्तनकार भजनी मंडळी भाविक भक्त उपलब्ध उपस्थित होते बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली तुकाराम माऊली माऊली माऊली या नामस्मरणाने संपन्न झाला अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सांस्कृतिक कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






