माजलगाव नगरपरिषद ची जमीन बोगस फेरफार करून बळकावली नवीदोद्दीन सिद्दीकी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पवार

जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन ताब्यात घ्यावी अन्यथा १५ जुलै पासून आमरण उपोषण

माजलगाव येथील नगरपरिषदची सर्वे नं.०५, ०६, ०७, ०८, व शहरातली विविध सर्वे नंबर ची शासकीय राखीव व ओपन स्पेस जमीनीची बेकायदेशीर फेरफार गुंठेवारी व पी.टी.आर. रद्द करून जिल्हाधिकारी यांनी जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी व संबंधितांची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिनांक १५ जुलै २०२५ रोजी आमरण उपोषण करत असल्याचा इशारा समाजवादी पार्टीचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, माजलगाव शहरातील नगरपरिषद ची ओपन स्पेस व घरकुलाची आरक्षित व इतर राखीव शासकीय जमीन माजलगाव न.प. चे मुख्याधिकारी, लिपिक व इतर कर्मचाऱ्यांनी माजलगाव शहरातले काही मोठमोठे पुढारी व भूमाफिया यांच्याशी संगमत करून नगर परिषद च्या शासकीय जागांची बोगस बेकायदेशीर गुंठेवारी करून अनेक एकर जमीन बेकायदेशीर बोगस संचिका तयार करून जमीन वर अवैधरित्या एन ए ले आऊट तयार करून विकून टाकली आहे. अशाप्रकारे शासकीय संपत्तीची विल्हेवाट लावली आहे. माजलगाव नगरपरिषद ची व नगरपरिषद हद्दीतील शहरातली सर्व सरकारी राखीव घरकुलाची व विविध शासकीय कार्यालयासाठी व नागरीकांना सामाजिक उपक्रमासाठी आरक्षित राखण्यात आलेली सरकारी जमीन व ओपन स्पेस जमीन संबंधितांनी विकली आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद ची शासकीय जमीन मोजणी करून तात्काळ ताब्यात घेऊन नगर परिषद जुना नकाशा सातबारा नुसार विविध ठिकाणची शहरातील सर्व सरकारी जमीन तात्काळ ताब्यात घ्यावी. सर्व गैर कायदेशीर गुंठेवारी, पी.टी.आर. व फेरफार रद्द करून या प्रकरणांमध्ये नगर परिषद व इतर सर्वच संबंधितांची कायदेशीर चौकशी करून व ज्या भुमाफीया व इतर सर्व संबंधितांनी व कर्मचाऱ्याऱ्यांनी नगरपरिषद ची शासकीय, आरक्षित व ओपन स्पेस जमीन बेकायदेशीर नवा जुना फेरफार करून गुंठेवारी केली आहे व शासनाची संपत्ती विकली आहे. या सर्व संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. नसता त्यांच्या बेकायदेशीर भोंगळ कारभाराविरोधात लोकशाही मार्गाने माजलगाव समाजवादी पक्षाच्या वतीने असंख्य कार्यकर्ते व नागरिकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिनांक 15 जुलै 2025 रोजी आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असा इशाराही नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी निवेदनातून दिला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल