स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत व्हावे. -सौ. भावनाताई नखाते
महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांच्या परंपरेचे आजही आपण अनुसरण करतो. संताकडून समता,बंधुता व सहिष्णुतेची शिकवण आपणास मिळते.हे अगाध ज्ञान जीवन जगताना खूप मोलाचे आहे. विद्यार्थ्यांनी ही ज्ञानी होण्याचा निश्चितच प्रयत्न करावा व ज्ञानवंत व्हावे असे आवाहन परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांनी केले.
दिनांक ६ जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीनिमित्त शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता .पाथरी जि.परभणी येथे ज्ञानदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. ज्ञानदींडीस डॉ. सौ.शिवप्रियाताई नखाते सौ. दिपालीताई नखाते, मुख्याध्यापक नवनाथ यादव, प्राचार्य किशन डहाळे, उपमुख्याध्यापक नारायण जाधव, परमेश्वर खरात,चांगदेव शास्त्री महाराज,महेंद्र कांबळे, बळीराम चव्हाण, आसाराम सोनवणे, अरविंद गजमल आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वारकरी वेशामध्ये दिंडीमध्ये सहभाग नोंदवला तुळशी कलश,विना,टाळ – मृदंगासह विठ्ठल हरिनाम व ज्ञानोबा तुकाराम या गजराने सर्व परिसर दुमदुमला. चांगदेव शास्त्री महाराज यांनी ज्ञान दिंडीचे संचालन केले.
मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व विद्यार्थी,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना फराळाचे वाटप करून ज्ञानदिंडीची सांगता करण्यात आली.
शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे आयोजित ज्ञान दिंडी कार्यक्रम प्रसंगी विठ्ठल व रुक्माई प्रतिमेचे पूजन करताना सौ.भावनाताई नखाते डॉ.सौ. शिवप्रियाताई नखाते, सौ. दिपालीताई नखाते मुख्याध्यापक नवनाथ यादव प्राचार्य किशन डहाळे आदी उपस्थित होते

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






