दौंड नगरपालिकेत ‘राष्ट्रवादी’चे आंदोलन

स्वराज्य वार्ता गणेश कोकरे 

दौंड प्रतिनिधी:- कचरा संकलन व स्वच्छतेची फेरनिविदा नियमबाह्य पद्धतीने प्रकाशित केल्याचा दावा…

दौंड नगरपालिकेच्या कचरा संकलन व स्वच्छतेची फेरनिविदा नियमबाह्य पद्धतीने प्रकाशित केल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. कचरा संकलित करणारे ठेकेदार आणि नगरपालिका प्रशासनाच्या संघर्षांमुळे गेल्या पाच महिन्यांपासून शहरात कचरा संकलन ठप्प झाले आहे.

दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मुख्याधिका-यांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केले. शहर स्वच्छतेसाठी एकूण ३ कोटी ९८ लाख रुपये वार्षिक खर्च असलेली निविदा नगरपालिकेने प्रकाशित केली होती. सदर निविदा तीन ठेकेदारांनी भरल्या होत्या. त्यापैकी एक ठेकेदार अपात्र ठरल्याने २५ एप्रिल २०२५ रोजी फेरनिविदा काढण्यात आली. राष्ट्रवादीच्या पदाधिकान्यांनी २७ सप्टेंबर २००९ रोजी प्रकाशित झालेल्या एक शासन निर्णयाच्या आधारे दोन निविदा प्राप्त झाल्यास नियमानुसार दोन क्रमांक असलेली निविदा (लिफाफा) उघडून पुढील कार्यवाही करण्याचे स्पष्टपणे नमूद केल्याचा दाखला दिला. या शासन निर्णयानुसार दुसऱ्या क्रमांकाच्या निविदेचा विचार न करता मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी गुरुवारी (ता. ३) फेरनिविदा काढल्याने आंदोलन केले.कचरा संकलनासंबंधी निविदा प्रक्रिया ठराविक ठेकेदारांच्या हितासाठी राबवून नगरपालिका प्रशासन फेरनिविदा करवत असल्याचा दावा करीत मुख्याधिकाऱ्याविरुध्द या वेळी घोषणा देत निषेध केला. माजी नगरसेवक अनिल साळवे, जिवराज पवार, राजेश गायकवाड, वसीम शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख आनंद पळसे यांच्यासह उमेश जगदाळे, प्रशांत धनवे, निखिल स्वामी, किरण लबडे, आदी आंदोलनात सहभागी होते. याचाबत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना विचारले असता त्यांनी नियमानुसारच फेरनिविदा काढण्यात आली आहे. ४ जुलै नंतर आठ दिवसांनी प्राप्त निविदा उघडून छाननी केली जाईल, असे सांगितले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल