स्वराज्य वार्ता राम राठोड
आष्टी:- आज व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूल कनकवाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शंकर गंगथरे यांनी सांगितले की सध्याच्या युगातील डिजिटल शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षण व संस्कार देखील तेवढेच आवश्यक आहे.

याप्रसंगी व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखामध्ये तर विद्यार्थिनी नऊवारी साडी रुक्मिणीच्या पोशाखामध्ये आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आकर्षक रिंगण सोहळा पार पाडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी येथील व्यापारी अरुण भाऊ डोईजडकर व भागवत जगताप तसेच शाळेचे प्रिन्सिपल श्री गजानन कासतोडे सर , धर्मराज घाटूळ सर, राम अमरुले सर , परमेश्वर अमरुले सर, संदीप राठोड सर, साजिद सर अक्षय फासाटे सर,श्रीमती सुजाता गंगथरे, साक्षी सातपुते, सपना गिराम प्रतीक्षा कुरधने आदींची उपस्थिती होती.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






