मंजुर झालेले घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे थकीत हप्ते तात्काळ वितरीत करणे बाबत मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी यांना निवेदन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

पाथरी शहरातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झालेले आहे. मंजुर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांनी तडजोडी नुसार उधारी करुन घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. व नविन बांधलेल्या घरामध्ये गृहप्रवेश देखील केलेले आहे. तरी देखील अद्यापपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत घरकुलाचे थकित हप्ते नगर परिषद पाथरीने वितरीत केलेले नाही. यामुळे लाभार्थ्यांना दैनंदिन मध्ये ब-याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. या बाबीवर प्रशासनाने गांभीर्याने विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी आपण प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत मंजुर झालेले घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे थकीत हप्ते तात्काळ वितरीत करावे. अन्यथा मा.आ. बाबाजानी दुर्राणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व लाभार्थी नगर परिषद पाथरी कार्यालया समोर अमरण उपोषणास बसुन तिव्र अंदालने करतील याची गांभीर्य पुर्वक नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल