स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
जिल्हाधिकारी, सीईओ यांच्या उपस्थितीत कलावंतांनी केले सादरीकरण 135 अर्जांची झाली पडताळणी
बुधवार दि.2 जुलै 2025 रोजी राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना 2024 – 25 अंतर्गत कलावंतांचे अर्ज पडताळणी व कला सादरीकरण कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात संपन्न झाला.यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप घोन्सीकर, महिला व बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस के भोजने, नरेगा गट विकास अधिकारी नीलपत्रेवार, सहाय्यक गट विकास अधिकारी जयराम मोडके, कलावंतांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
135 कलावंतांच्या अर्जांची पडताळणी यावेळी करण्यात आली यापैकी जवळळपास 80 कलावंतांनी आपली सादरीकरणे सादर केली. कलावंतांच्या सादरीकरणाचे परिक्षण न्यू लाईफ ब्लड बँकेचे चेअरमन डॉ.पंकज खेडकर, सुरेंद्र भालेराव, प्रकाश पंडित, राहुल वहिवाळ, अरुण शहाणे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदीप घोन्सीकर, सूत्रसंचालन संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुधीर पिंगळकर, विस्तार अधिकारी राजाराम सूर्यवंशी, ग्रामपंचायत अधिकारी गणेश गीते, गोविंद बादाड, संदीप इजाते, सचिन वानखेडे, भिसे, चौरे, पडताळणीसाठी नियुक्त करण्यात आलेले विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
*********
चौकट :-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना 2024 – 25 अंतर्गत 1255 कलावंतांचे अर्ज प्राप्त होते त्यापैकी 135 पात्र अर्जांची पडताळणी करून कलावंतांच्या कलांचे सादरीकरण करण्यात आले. दरवर्षी जिल्ह्यातील 100 कलावंतांची मानधन योजनेसाठी निवड करण्यात येणार आहे.
*रघुनाथ गावडे*
जिल्हाधिकारी, परभणी.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






