स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
उल्हासनगर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे कार्यकर्ते यांच्या अंतर्गत दि.२६/०६/२०२५ रोजी उल्हास नगर वाहतूक शाखेचे मा.विजय पोवार (ACP) यांची भेट घेऊन MH05 हद्दीतील अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या रिक्षा चालक मालक संघटना कायदेशीर मान्यता प्राप्त असल्यास त्या प्रत्येक रिक्षा संघटनांचे रजिस्ट्रेशन चेक करण्याची मागणी केली कारण गेल्या अनेक वर्षांपासून रजिस्ट्रेशन नसणाऱ्या रिक्षा संघटनांचे जाळे वाढले असून काही संघटनांनी परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमीतील गुंड बांऊसर कामाला ठेवले असून रिक्षा चालक मालक यांच्या कडून दररोज १०रू. कलेक्शन वसुली करत अून अशा प्रकारे वसुली अनेक शहरातील संघटना करत असून रिक्षा चालक मालक यांचे भविष्य घडविण्यासाठी कोणतेही ठोस कार्य या संघटनांच्या माध्यमातून होत नसल्याचे स्पष्ट दिसून आले असून MH05 हद्दीतील प्रत्येक रिक्षा चालक मालक संघटना अधिकृत किंवा अनधिकृत यांचे कायदेशीर रित्या रजिस्ट्रेशन चेक करण्याची मागणी करण्यात आली असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगरपालिका कार्यालय, महानगरपालिका कार्यालय, वाहतूक विभागीय कार्यालय तसेच स्थानिक पोलीस स्टेशन येथे रिक्षा संघटनेच्या रजिस्ट्रेशन नोंदणी चेक करण्याची मागणी करण्यात आली आहे कारण आमच्या माहिती प्रमाणे अनेक वर्षांपासून रिक्षा संघटनांच्या नावावर स्वतः च्या मनमर्जीने रस्त्यावर कब्जे केले करत मनमर्जीने फक्त आणि फक्त रिक्षा चालक मालक यांच्या कडून दररोज १० रू. वसुली करून स्वतः चांगल्याप्रकारे कमाई करून बसले असून कायद्या अंतर्गत प्रत्येक रिक्षा चालक मालक संघटना अधिकृत किंवा अनधिकृत असणार्यां प्रत्येक रिक्षा चालक मालक संघटनांचे रजिस्ट्रेशन चा अहवाल तपासणी करण्यात आला पाहिजे तसेच रिक्षा चालक मालक यांचे दररोज १० रू.कलेक्शन घेण्याची कोणतीही कायदेशीर प्रोसीजर नसून संघटना चालवण्या साठी महिन्याचे फक्त ५० किंवा १०० रू. संघटना चालवण्यासाठी घेऊ शकतात अशी कायदेशीर तरतूद असून त्या रक्कमेची पावती देणे बंधनकारक असते स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी संघटने अंतर्गत जास्त पैसे घेतल्यास तो खंडणी चा गुन्हा ठरू शकतो अशा प्रकारे मा.विजय पोवार साहेब यांच्या सोबत चर्चा झाली असून प्रत्येक रिक्षा चालक मालक संघटनांचे रजिस्ट्रेशन चेक करण्याची मागणी करण्यात आली आहे. दि.२/०५/२०२५ रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ,मा.परिवहन आयुक्त अधिकारी साहेब यांच्या पर्यंत ह्याच मुद्द्यावर पाठपुरावा केल्याचे विजय पोवार साहेबांना सांगितल असून लेटर सोबत झेरॉक्स प्रत जोडून देण्यात आले आहे.विजय पोवार साहेब यांच्या सोबत चर्चा करताना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे. अंबरनाथ तालुका अध्यक्ष आशिष देशपांडे, उल्हास नगर तालुका अध्यक्ष नितीन पाटणकर, कल्याण शहर अध्यक्ष देवीदास कुंजेटवाड, उल्हास नगर विभाग संघटक हसन पठाण यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून विजय पोवार साहेबांनी सर्व मुद्यांवर लक्ष घालून योग्य उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!