डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे घवघवीत यश

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष व अंतिम वर्ष डी फार्मसी च्या परीक्षेत डी. जे. पी. एस फार्मसी महाविद्यालय पाथरीने घवघवीत यश मिळवले आहे. महाविद्यालयाने उच्च निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे.महाविद्यालयाची डी फार्मासि प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु. साक्षी पोपळघट हिने 85.73 टक्के ,कु. अश्विनी कदम हिने 82.60 टक्के तर कु. गौरी पोपळघट हिने 80.50 टक्के गुण घेऊन अनुक्रमे प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक पटकवला तसेच डी फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कु. वैष्णवी मजमुले हिने 85.73टक्के,कु.ज्ञानेश्वरी घोडके हिने 82.73 टक्के तर कु. वैष्णवी शिंदे हिने 81.50टक्के गुण घेऊन अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकवला. विद्यार्थ्याच्या यशासाठी परभणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुलजी पाटील , परिहार व रमेश पाटील सर,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले आणि डी. फार्मसी चे विभाग प्रमुख प्रा. ओंकार गोंगे ,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल