रायगव्हाण भागातील रस्ता रुंदीकरणाच्या कामास सुरुवात ६ कि.मी.चा रस्ता, चार पुलांच्या कामासाठी २४ कोटींचा निधी

स्वराज्य वार्ता,प्रतिनिधी सुनील गायकवाड

 

आष्टी पाथरी रस्त्यावर असणाऱ्या रायगव्हाण या जालना जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून आष्टी ते पाथरी रस्त्यावर रायगव्हाण परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणाचा डांबरीकरण व मजबुतीकरण काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. अनेकदा उद्घाटन झाले नंतर महिने महिने काम प्रलंबित राहते परंतु आमदार लोणीकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुरामुळे उद्घाटनानंतर लगेचच कामाला सुरुवात झाली आहे. दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात लोणीकर म्हणाले की, परतूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला डांबरीकरणाच्या पक्या रस्त्याने जोडण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला असून मतदारसंघातील एकही गाव वाडी वस्ती तांडा डांबरीकरणाच्या रस्त्यापासून वंचित राहिले नाही. अहिल्यानगर शेवगाव पैठण पाचोड अंबड पाथरी आष्टी आष्टी पाथरी महामार्गवरील रायगव्हाण भागात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. (छाया हरूण कच्छी) रस्ता होणार सुकर परभणी व जालना या दोन जिल्ह्यांना जोडणारा व परभणी जिल्ह्यातील नागरिकांना छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सर्वांत सोयीस्कर आणि सोपा असणारा रस्ता म्हणून आष्टी-पाथरी रस्त्याकडे बघितले जाते या रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ कायम असते. या रस्ता रुंदीकरण डांबरीकरण व मजबुतीकरण कामामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण होणार आहे. रस्ता रामा ६१ वर ६ किमी लांबीचा डांबरीकरण, मजबुतीकरण व रुंदीकरण रस्ता तयार केला जातो आहे. १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल