संशयास्पद बनावट खत बाळगल्याप्रकरणी पाथरी पोलिस स्टेशन ला या प्रकरणी गुन्हा दाखल

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

ऐन सिजनलाच होतो खतांचा कृत्रिम तुटवडा
दुकाने तपासणीनंतर बफर स्टॉकचे वितरण

पाथरी शहरात व तालुक्यात दरवर्षीच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच युरिया व डीएपी या खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होऊन शेतकऱ्यांची लूट होणे हे आता नित्याचे झाले आहे. यावर्षी देखील अजून पूर्ण पावसाळा सुरू झाला ही नाही तरीही युरिया व डीएपी या खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूट चालू होती याविषयी स्थानिक शेतकरी तसेच शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आलोक चौधरी यांनी कृषी राज्यमंत्री यांच्याकडे याविषयी तक्रार केली होती त्या अनुषंगाने दुकाने तपासणीचे आदेश देतात बऱ्याच दुकानदाराकडे युरिया डीएपी खताचा बफर स्टॉक शिल्लक असल्याचे दिसल्यानंतर ते वाटप सुरू करण्यात आले आहे.
पाथरी तालुका हा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याखाली तसेच गोदावरी नदीवरील असलेल्या उच्च पातळी बंधार्‍यामुळे सिंचनाखाली आला असून त्यामुळे येथील शेतकरी ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळल्याने पाऊस पडल्यानंतर शेतकरी आपल्या ऊसाला खत टाकण्याला सुरुवात करतात तसेच कापूस सोयाबीन पेरणी हंगाम असल्याने पेरणीसाठी लागणारा डीएपी युरिया खत मोठ्या प्रमाणात लागत असतो याच संधीचा फायदा घेत खत दुकानदार मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डेड खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून दुकानदार हवे ते खत शेतकऱ्यांच्या माथी मारून आपले उखळ पांढरे करून घेतात या सर्व गोष्टी कृषी अधिकारी व तत्सम अधिकारी वर्गाच्या लक्षात येत नसल्याने मोठी शोकांतिका असल्याचे शेतकरी वर्गात बोलल्या जात आहे.

संशयास्पद बनावट खत कारखाना प्रकरणी एकावर गुन्हा दाखल!
कृषी राज्यमंत्र्यांचे खताचा तुटवडा निर्माण झाल्या प्रकरणी शहरातील खत दुकाने तपासणीचे आदेशाने पाथरी शहरातील दुकाने व गोडाऊन तपासण्याच्या अनुषंगाने पाथरी मानवत रोडवरील त्रिमूर्ती ऍग्रो एजन्सीच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊन मध्ये संशय ित व अनधिकृत खताचा साठा व विक्री करत असल्याच्या माहितीवरून पाथरी कृषी अधिकारी यांनी 15 6 25 रोजी भेट दिली असता या ठिकाणी असलेल्या गोविंद बळीराम पवार राहणार आनंदनगर तालुका पाथरी याने गोडाऊन भाडेतत्त्वावर घेतले आहे परंतु त्याची चाबी सध्या माझ्याकडे नाही असे सांगून गोदाम उघडून दाखवण्यास टाळाटाळ केली त्यामुळे अधिक संशय बळावल्याने सदरील गोदाम संबंधित व्यक्ती समक्ष सीलबंद करण्यात आला सदरील गोदामा मध्ये असलेल्या संशयास्पद खताच्या साठ्याच्या परवाना खरेदी बिल व गोदाम साठवणूक परवाना व त्या अनुषंगाने इतर कागदपत्रे 24 तासात सादर करण्याची सांगितले होते.
दिनांक 16 6 25 रोजी सकाळी बाराच्या सुमारास गोविंद लक्ष्मण कोल्हे खत निरीक्षक तथा तालुका कृषी अधिकारी पाथरी बालाजी बाबुराव मुंडे तंत्र अधिकारी गुण नियंत्रक विभागीय कृषी सहसंचालक लातूर गोविंद बाबुराव दहिवडे गुण नियंत्रक निरीक्षक परभणी एस आर साठे पोलीस शिपाई 16 98 पाथरी यांनी पंचा समक्ष सदर गोदामाची झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीच्या 315 बॅग आढळून आल्या सदरील सर्व खतांचे नमुने खत परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.
त्रिमूर्ती ऍग्रो एजन्सीच्या पाठीमागे मौजे पोहे टाकळी हद्दीतील शेत सर्वे नंबर 56 मधील 14 बाय 36 फुटाच्या गोडाऊन मध्ये सापडलेले संशय अवैध खते साठवणूकदार गोविंद बळीराम पवार राहणार आनंदनगर तालुका पाथरी याच्याविरुद्ध खत उत्पादन विक्री व साठवणुकीचा अधिकृत परवाना न घेता खत सदृश्य वस्तू संशयास्पदरीत्या अनधिकृत रित्या शेतकऱ्यांना विक्री व वितरण करून व वितरण करून त्यांची फसवणूक खत विक्री करण्याच्या उद्देशाने खतांचा साठा बाळगलेला मिळून आल्याबद्दल त्याचे विरुद्ध खोत नियंत्रण आदेश भारतीय न्याय संहिता 318 (4) 223 प्रमाणे पाथरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील अधिक तपास सुरू आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल