डॉ निवृत्ती भाऊ जाधव: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित

स्वराज वार्ता प्रतिनिधी बबनराव वि आराख

 

चिखली तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात मध्ये निरपेक्ष सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित तथा अध्यक्ष संजीवनी बहुउद्देश्य शिक्षण प्रसारक संस्था केळवद, ता. चिखली जि.बुलढाणा यांना नुकतेच अमरावती मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ . निवृत्तीभाऊ यांचे विविध मान्यवराकडून अभिनंदन करण्यात येत आहे आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक ,कला ,सामाजिक कार्य , कृषी ,आदर्श गाव, महिला बालविकास , क्रीडा, महिला बालकल्याण ,समाज कल्याण ,कामगार कल्याण इत्यादी कामाचा विचार करून केलेल्या कार्याचा गौरव अंबाई बहुउद्देश्य संस्था अमरावती या संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्काराने सौ माधुरी सचिन चव्हाण यांनी सन्मानित केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून डॉ निवृत्ती भाऊ जाधव संजीवनी संस्थेच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा, एक पालक ,विधवा , विदुर, सामूहिक विवाह सोहळा, आरोग्य उपक्रम इत्यादी प्रकारचे कार्य सातत्याने राबवित आहे कामगारांसाठी पेट्या वाटप ,नोंदणी करणे त्या कामगारांचे हक्क मिळवून देणे असे अनेक समाज उपयोगी कार्य केलेले आहे या कार्य बद्दल त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते मिळालेला आहे तसेच १ मे २०२५ रोजी जिल्हा युवा पुरस्कार किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या हस्ते सुद्धा शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना त्यांना अवॉर्ड इंटरनॅशनल सोसायटी दिल्ली यांच्याकडून डॉक्टर डिग्री सुद्धा मिळालेली आहे . डॉ निवृत्ती भाऊ जाधव यांना आतापर्यंत राज्यस्तरीय ४० पुरस्कार मिळालेले आहेत या प्रसंगी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे कार्यक्रमाचे अध्यक्ष गव्हर्नर आई कमलताई गवई व अमरावतीचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे , केंद्रीय सामाजिक मंत्री यांचे पी ए मनीष शंकरराव गवई ,साहित्यिक विष्णू सोळंकी, नाळ चित्रपटातील बालकलाकार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास पोकळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दि. ११ जून २०२५ रोजी अमरावती येथील ‘क्षितीज रिसोर्ट’ येथे सदर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. डॉ निवृत्ती भाऊ जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून,त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल