स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
शिवसेना नेते सईद खान यांची राजकीय छवी खराब करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर मनी लॅन्ड्रींग सारखे खोटे गुन्हे दाखवत ईडीची कारवाई करण्यात आली होती.परंतु संविधानाने चालणाऱ्या न्यायालयाने १२ जून रोजी निकाल देत न्यायालयाने यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.या निमित्ताने पाथरी येथील संविधान प्रेमी एल.आर कदम यांच्या वतीने शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान प्रत देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मिठाई वाटून आनंद ही साजरा करण्यात आला.यावेळी सईद खान यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होता.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






