पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून धर्मशाळेचे भूमिपूजन नामघोषेत भजनी मंडळ शोभायात्रेत शेकडो भक्तांनी सोहळा उत्साहात संपन्न

स्वराज्य वार्ता नांदेड प्रतिनिधी चंपतराव डाकोरे पाटिल

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून दिनांक ९ जून रोजी नांदेड जिल्ह्यातील व राज्यभरातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर नगरपालिका क्षेत्रात घेतलेल्या जागेवर धर्मशाळेचे भूमिपूजन संपन्न झाले.या भूमिपूजन सोहळ्यासाठी श्री. श्री. श्री १००८ गुरुवर्य प्रयागगिरीजी महाराज,श्री मोहनगिरी महाराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर, संस्थापक सचिव हभप व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर,
प्रसिद्ध उद्योजक जगन्नाथ चक्रवार,स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री विजयरावजी देवडे साहेब,सहसचिव प्रभाकर महाराज,कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड,संस्थापक सदस्य प्रवीण महाराज पारडीकर, गुलाब पा.उबाळे,हरिनाम पा.कदम,भगवान पा. रहाटीकर ,बंडू पा.कदम,संस्थेचे मार्गदर्शक श्री रावसाहेब पा.,श्री दत्तराम पा.एडके ,श्री दत्तराम गोरठेकर,श्री शिवाजी पांगरेकर,श्री बालाजी जाधव, श्री बालाजी पा.भरकडे ,श्री लक्ष्मणराव शिरूळे, प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे, श्री गणेश पा.पवार, ऊतम बोपेवार सर,राहुल म्हाडीक महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.अनिताताई पतंगे,सचिव सौ.कालिंदीताई पंढरपूरकर, उपाध्यक्ष सौ.कान्होपात्राताई कुंडलवाडीकर,महिला सदस्य सौ.कुसुमताई शिंदे, सौ. जयश्रीताई जाधव शेकडो भाविक भक्त भजनी मंडळ पंढरपुर येथे उपस्थित होते. सर्वांनी श्री विठ्ठल रूक्मिणीचे सकाळी ७:०० वाजता दर्शन घेऊन ९ ते ११ या वेळेत नामदेव पायरी ते गुरूदेव नगर पंढरपूर इथपर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात नामघोष करत शेकडो भाविक भक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते. या शोभायात्रेत भाविकांना जागोजागी फळे वाटुन स्वागत करण्यात आले.
शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर धर्मशाळेच्या जागेवर श्री श्री १००८ महंत प्रयागगिरीजी महाराज व श्री मोहनगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व संस्थेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.
तदनंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर केले त्यांनी आम्ही वारकरी परिवाराच्या आजपर्यंतच्या कार्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हभप व्यंकटराव पा.जाधव माळकौठेकर यांनी केले.
याप्रसंगी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रभाकर पा. पवळे,बालाजी पा.शिंदे, सोपान पा.गिरे,विठ्ठल पा. धारजणे, मारोती पा.वडजे, राजेश्वर पा.गागलेगावकर,श्री विवेकानंद पा.कसरे,श्री शंकर देवकत्ते,श्री माधवराव बोईनवाड, श्री उमाजी पा.धोंडगे,श्री बालाजी पा.पवार , श्री बबलू पा.वरताळे, श्री सतीश पानचावरे, श्री साहेबराव जाधव, श्री कपिल पांचाळ,श्री राजू घोरबांड साधारणता: तीनशेच्या वर पदाधिकारी उपस्थित होते..आम्ही वारकरी परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना राहण्याची ,नास्ता व भोजनाची व्यवस्था केली होती.
या कार्याचे संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे.
असे प्रसिध्दीपत्रक चंपतराव डाकोरे पा. प्रसिध्दी कोषाध्यक्ष रामभाऊ चन्नावार यांनी दिले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल