स्वराज्य वार्ता पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी, जि. परभणी येथील श्री देवलिंग देवडे हे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष आहेत
त्यांनी परभणी जिल्हा व पाथरी तालुक्यात दिव्यांगासाठी ची विविध प्रकारची आंदोलने/उपोषणे/धरणे आंदोलन तसेच दिव्यांगासाठी चे विविध प्रकारचे उपक्रम राबवले व ते यशस्वी करूनही दाखवले त्यामुळे माननीय आमदार श्री बच्चू कडू यांचे कडून नांदेड येथे अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा”संताजी धनाजी”कार्यकर्ता पुरस्कार समारंभात *संत गाडगेबाबा* सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ हा पुरस्कार असामान्य योगदानाबद्दल देण्यात आला असून याप्रसंगी देवडे हे सपत्नीक या समारंभाला उपस्थित होते.
श्री देवडे यांनी गेल्या 35 ते 40 वर्षापासून दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध प्रकारे कार्य केले आहे व जास्तीत जास्त दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला
हे सर्व लाभ बचत गटाच्या माध्यमातून मिळवून दिले त्यामुळे तळागाळातील बहुतांश दिव्यांगांना त्यांनी केलेल्या कार्याचा लाभ झाला.
बचत गटाच्या माध्यमातून गरजू दिव्यांगांना कर्ज पुरवठा करून, दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसाय उपलब्ध करून देणे, व अडचणीतून मार्ग काढण्याचे सत्कार्य केले.
दिव्यांगातील तरुण मुला-मुलींचे विवाह जुळविणे व वधू वर मेळावे घेण्याचे ही काम त्यांनी केले.
दिव्यांगाना जयपूर फूट, व्हील चेअर, श्रवण यंत्र, अंधांना आधार देणारी काठी, इत्यादी कार्य केले, सामाजिक कार्यातून निरक्षरांना साक्षर करण्याचेही काम त्यांनी मोठ्या सीताफिने केले
परभणी/हिंगोली/व नांदेड या तीनही जिल्ह्यातून श्री देवडे यांचा प्रथम क्रमांक आला असून त्यांना हा पुरस्कार प्रहार संघटनेचे मुख्य प्रवर्तक, व दिव्यांगांचे कैवारी माननीय आ. श्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते वामनराव नरवाडे मंगल कार्यालय नांदेड येथील समारंभात देण्यात आला
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






