संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ यांचे सन २०२४-२५ आर्थिक बजट ची तरतूद करून महामंडळातील जाचक अटी शिथिल करा नानासाहेब घोडके

स्वराज्य वार्ता किसन पवार

समाजिकन्याय मंत्री संजय सिरसाट यांना निवेदन

माजलगाव दि २५ (बातमीदार) संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे सन २०२४ -२५ च्या आर्थिक बजेट ची तरतूद करून महामंडळाच्या जाचक अटी शिथिल करा अश्या मागणिकचे निवेदन बीड जिल्ह्या अध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी सामाजिकन्याय मंत्री संजय सिरसाट यांना माजलगाव येथील सत्कार संरभ प्रसंगी देण्यात आले
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना संजय सिरसाट यांचा माजलगाव येथील बहुजन समाज बांधवाच्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन दि. 24/5/2025 रोजी करण्यात आले होते या प्रसंगी त्यांना संत राष्ट्रीय चर्मकार महासंघ बीड च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
समाजकल्याण विभागाचा निधी इतर खात्यात वळविण्यात आल्याबाबत.
संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळातील कर्ज प्रकरणे २०२३-२४, २०२४-२५ निधी अभावी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही लाभधारकांनी सहभाग भरून देखील त्यांना आजतागायत धनादेश मिळाला नाही. चर्मकार समाज मोलमजुरी तसेच गटई काम करून आपली हलाखीच्या परिस्थितीत उपजीविका चालवीत आहे. त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी उद्योग धंद्यासाठी कर्जाची अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठी आपल्या समाजकल्याण विभागामार्फत आर्थिक निधी शासनाच्या इतर योजनासाठी न वळविता संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळास उपलब्ध करून देण्यात यावे.
तसेच शैक्षणिक कर्ज यांना निधी उपलब्ध करून जामीनदाराची अट वगळण्यात यावेत. शैक्षणिक कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात यावेत. सिबिल स्कोर व जीएसटी कोटेशन ची अट रद्द करण्यात यावी.
संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाची सर्व कर्ज प्रकरणे सरसकट कर्जमाफी करण्यात यावेत. बार्टी व आर्टी च्या धर्तीवर संत रोहिदास संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात यावी. समाजकल्याण च्या वतीने गटई कामगारांना ऊन, वारा,पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी स्टॉल ची योजना चालू केलेली आहे. २ वर्षापासून गटई कामगारांनी स्टॉल चे प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्यास तत्काळ मंजूरी देण्यात यावी.
मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मध्ये चर्मकार समाजातील घटकांना न्याय देण्यात यावा एनएफडीसी अंतर्गत १० ते ५० लाखांपर्यंत कर्जप्रकरणा चा प्रस्ताव घेऊन वाटप करण्यात यावे. या मागण्याची दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी विनंती सदरील निवेदनातुन केली आहे
या वेळी जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके , युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव , जिल्हा सचिव अॉड दत्ता जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बालासाहेब गवळी, जिल्हा संघटक राधाकीसन भाळशंकर, माजी कर्मचारी जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, माजी कार्याध्यक्ष सत्यनारायण उनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे, कर्मचारी तालुकाध्यक्ष सिताराम सोनवणे, राजू भैय्या शिंदे, युवा तालुकाध्यक्ष आकाश कांबळे, तालुका उपाध्यक्ष अर्जुन पोहेकर, शहर अध्यक्ष प्रसाद वाघमोडे, शहर उपाध्यक्ष संतोष खंडागळे, शहर सचिव मनोज वाघमारे, वसंत वाघमारे, संतोष जाधव, नारायण पोहेकर, मयूर वाघमारे, ज्ञानेश्वर लोकरे इ. पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल