स्वराज्य वार्ता / बबनराव आरख
तापलेली भुई रे मागे
मेघाकडे दान
जगी थोर तुझी कीर्ती
तूच रे महान
शनी सुंदर पाखरांनी
टाकली रे मान
येरे येरे पावसा तू
आता भागव तहान
काळा-सावळा हा
गर्जतो रे घन:श्याम
थेंबा थेंबातूनी वर्षावाच्या
हिरवे हे पान
रानी सुंदर पाखरांनी
टाकली रे मान
येरे येरे पावसा तू
आता भागव तहान
झाली काहिली जीवाची
कंठाशी आले प्राण
काळ्या मातीच्या लेकरांची
राख आता शान
रानी सुंदर पाखरांनी
टाकली रे मान
येरे येरे पावसा तू
आता भागव तहान
…………………..
राष्ट्रीय कवी- संजय निकम
मालेगाव जि. नासिक
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






