सरस्वती अकॅडमी व अक्षय कॉम्प्युटर्स पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रम
स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी पाथरी
पाथरी प्रतिनिधी : सरस्वती अकॅडमी व अक्षय कॉम्प्युटर्स, पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन समारंभ मंगळवार, दि. २७ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बालाजी मंदिर, ओंकार नगर, पाथरी येथे अत्यंत प्रेरणादायी व उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास पाथरी परिसरातील अनेक मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. दादासाहेब काका टेंगसे, माजी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद परभणी हे होते. तर प्रा.अनिल उजगरे सर, अपेक्ष अकॅडमी पाथरी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. दोघांनीही आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना यशाचे मार्ग सांगत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमात यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हा कार्यक्रम मोलाचा ठरला.
प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रा.लक्ष्मणराव घुंबरे, प्रा. कृष्णाजी टेंगसे, प्रा.प्रल्हादराव शिंदे , प्रा.अर्जुन रनेर, प्रा. छत्रगुण नखाते, प्रा.रविराज फुलवरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या तज्ज्ञांनी विविध विषयांवर – स्पर्धा परीक्षा, करिअर निवड, डिजिटल शिक्षण, व्यवसायिक संधी यावर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम पौळ यांनी केले तर सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.संदीप टेंगसे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. संदीप टेंगसे, सौ. कोमल टेंगसे, श्री. तुकाराम पौळ सर व सौ. शिवकन्या पौळ यांच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमामुळे पाथरी तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून, भविष्यात असेच प्रेरणादायी कार्यक्रम घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






