स्वराज्य वार्ता प्रतिनिधी: दिनेश दिलीप सूर्यराव
मुरबाड तालुक्यातील इंदे या गावी मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट चालू असताना आपल्या घरा समोरील जनावरांच्या गोठ्याचा ( वाड्याचा) आडोसा घेऊन उभा असलेला १६ वर्षीय युवक यश रमेश लाटे याचा २५/०५/२०२५ रोजी अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यश रमेश लाटे हा महात्मा गांधी विद्यालय धसई या शाळेचा विद्यार्थी असून इयत्ता दहावीची परीक्षा चालू वर्षी उत्तीर्ण झाला होता त्याचे कॉलेजला जाण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. इंदे, सायले, साजगाव,उमरोळी, आनंदवाडी या गावात तसेच पंचक्रोशीत सदर घटनेची हळ हळ व्यक्त केले जात आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






