शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमण धारकाची माहिती सादर करणे यावी

स्वराज्य वार्ता / राम राठोड

जालना : शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमण धारकाची माहिती सादर करणे यावी. मा. तहसीलदार यांनी परिपुर्ण माहिती दिली नसल्याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी साहेब, जालना यांना देण्यात आले.

संदर्भ कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन क्र. जमीन 2022/प्र.क्र. 196/ज.-1 दि.6 जानेवारी 2025 चे पत्र आम्ही विविध सामाजिक संघटनेच्या वतीने गायरान जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे होणे बाबत. तसेच वेळोवेळी मोर्चे, आंदोलन केलेले आहे.
त्या अनुषंगाने मागील पावसाळी अधिवेशनात मा. मुख्यंमत्री देवेंद्रजी फडवणीस व उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हा सर्व गायरान धारकाची माहिती मागून घेऊन आपणास योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जालना येथे जाहिर सभेत या बाबतची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने कक्ष अधिकारी यांचे पत्र आपणास प्राप्त झाले आहे व त्या अनुषंगाने आपणही जालना जिल्हयातील सर्व तहसीलदाराकडून माहिती मागितली आहे. ती संपुर्णतः चुकीच्या पध्दतीने सादर केल्याचे आमच्या निर्देशनास आल्यामुळे आम्ही आपणास पुनश्च विनंती करीत आहोत की, आपण पुन्हा सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आदेश देऊन सर्व गायरान जमीनीची सद्य परिस्थिती प्रत्येक ग्राम महसुल अधिकारी यांच्या कडून प्रत्यक्ष जागेवर जावून व गाव नमुना 1-ई ला नोंद घेण्यात यावी व योग्य ती माहिती शासनास सादर करावी सदर प्रकरणात तहसीलदार व ग्राम महसुल अधिकारी यांनी शेरा कोठेही लिहीला नाही. यामुळे सदर माहिती ही अपूर्ण सादर होऊन आम्हाला न्याय मिळणार नाही.
तरी कृपया आपण गायरान जमीनीची माहिती शासनास सादर करते वेळी महसुल ग्रामविकास अधिकारी यांना प्रत्येक जमीनीचा पंचनामा व इतर अहवाल मागून योग्य तो अहवाल शासनास सादर करावा.
सद्य पस्थितीथी जे प्रस्ताव आपणाकडे तहसीलदार यांनी सादर केले आहे. यामध्ये अनेक त्रुटी असल्यामळे आपण पुन्हा एकदा मा. उपविभागीय अधिकारी अंबड, परतूर यांना पत्र देऊन रितसर अहवाल मागवून घ्यावा अशी मागणी सुभाष मुंढे, (बाबा) संस्थापक अध्यक्ष लोकमोर्चा म. राज्य,
संजय सहजराव, लोकर्मार्चा ता. मंठा प्रतिनिधी, दिनकर घेवंदे, परिवर्तन असंघटीत कामगार संघ अध्यक्ष, यांनी निवेदना मार्फत केली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल