भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून नमाज अदा  मानवत येथे मुस्लिम समाजाचा शांततेत निषेध 

स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी पाथरी 

मानवत : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत, मानवत येथे मुस्लिम समाजाकडून शांततेत निषेध व्यक्त करण्यात आला. बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या आवाहनानुसार आणि मोहम्मद मुस्ताक यांच्या मार्गदर्शनाखाली, शुक्रवारी नमाज अदा करताना मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून आपला संताप व्यक्त केला.

शुक्रवारी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते. नमाज पठणानंतर कोणताही गोंधळ न करता शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. काळ्या फिती या दु:ख आणि संतापाचे प्रतीक म्हणून वापरण्यात आल्या.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना मोहम्मद मुस्ताक म्हणाले, “दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. अशा हिंसक कृत्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. देशाची एकता व शांतता अबाधित राहावी, यासाठी सर्वांनी मिळून अशा प्रकारांवर आवाज उठवणे गरजेचे आहे.”

कार्यक्रम शांततेत पार पडला असून, पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवला होता. मुस्लिम समाजाच्या या उपक्रमातून देशप्रेम आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहोचला.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल