ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या कार्यक्रमास मुस्लिम समाजाने उपस्थित रहा –सलीम इनामदार 

स्वराज्य वार्ता अहमद अन्सारी पाथरी  

परभणी प्रतिनिधी : (जि प्र) शहरातील ईद गहा मैदान येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या कार्यक्रमासजास्त प्रमाणात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने उपस्थित राहुन मान्यवरांचे मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे अव्हान समाजसेवक सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केले.

देशात व अनेक राज्यात वक्फ कायदाविरोधात आंदोलने करण्यात येत असल्याने तयाचाच एक भाग म्हणून परभणी शहरात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा च्या वतिने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने कार्यक्रम कोण घेत आहे या कडे लक्ष न देता कार्यक्रम चांगल्या प्रमाणात कस होइल या कडे मुस्लिम बाधंव व नव युवकांनी लक्ष द्यावे असे अव्हान समाजसेवक सलीम इनामदार यांनी केले आहे.

देशातील अमच्या पूर्वजांनी मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांना विधवा परितकता महिला गरीब समुदया साठी अल्लाहा च्या नावे दान करून वक्फ केलेली जमीन असुन या सर्व जमीनी कोणत्याही राजकीय पक्षाचे व कोणत्याही राज्य सरकार किवा केन्द्र सरकार च्या नसुन या जमीनीवर अनेकांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला केन्द्र सरकार हे रोजगार बेरोजगार तरूणाई च्या हाताला काम देण्या ऐवजी केवळ मुस्लीम समाजाला टार्गेट करण्याचा डाव आखीत असल्याचे काम करीत आहे.

या कार्यक्रमास ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे अध्यक्ष मौलाना खालीद सैफुल्ला रहेमानी मौलाना उबेदुलल्ला खान आजमी मौलाना सय्यद सादत हुसेनी मौलाना अजगर अली इमाम मेहंदी मौलाना उमरैन महेफुज रहेमानी मौलाना फजल रहिम डाॅ. यासीन उसमानी एम आय एम चे अध्यक्ष बॅरिस्टर संसद सदस्य खा, असदोदीन अवेसी डाॅ.कासीम रसुल मौलाना मोइजो द्दीन कासमी यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने व शांतते च्या मार्गाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रमाणात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने सहभागी व्हावे असे अव्हान समाजसेवक सलीम इनामदार यांनी केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल