रेणाखळी येथे रेणुका वस्तीचे भाग्य उजळणार..! आमदार राजेश विटेकर यांनी दिला १० लक्ष चा निधी.

स्वराज्य वार्ता अहमद अन्सारी पाथरी

परभणी प्रतिनिधी : रायुकाँचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य नखाते यांचे हस्ते सिमेंट रस्ता व नाली बांधाकामाचा शुभारंभ.

पाथरी(वार्ताहर) : पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथे रेणुका वस्तीसाठी आमदार राजेशदादा विटेकर यांनी त्यांचे स्थानिक निधीतून १० लक्ष रूपये निधीतून मंजुरी दिलेल्या सिमेंट रस्ता व नाली बांधकाम चा शुभारंभ सोमवारी रायुकाँचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य नखाते यांचे हस्ते करण्यात आला आहे.त्यामुळे आता रेणाखळी येथे रेणुका वस्तीचे भाग्य उजळणार आहे.
उदघाटक म्हणून रायुकाँचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य नखाते यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल थोरात, संदीपान हारकळ , प्रकाश हारकळ,पांडुरंग हारकळ, प्रभू तालडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना रायुकाँचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य नखाते म्हणाले की, रेणाखळी येथे रेणुका वस्तीत रस्ता व नालीकाम ची गरज होती त्यामुळे आमदार राजेशदादा विटेकर यांनी येथे तातडीने दहा लक्ष रुपये आपले स्थानिक निधीतून मंजूर केला.हे काम गुणवत्ता व चांगले दर्जाचे करावे जेणे करून या वस्तीत रस्ता व नाली कामाची समस्या उद्भवणार नाही. आ.राजेशदादा विटेकर यांचे माध्यमातून तालुक्यातील विकास कामे मार्गी लावणेसाठी माझा प्रयत्न राहील असे नखाते यांनी सांगितले.हे काम सुरू झाल्याबद्दल रेणुका वस्तीतील ग्रामस्थ आनंदी झाले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल