आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करळेश्वरास दुग्धाभिषेक 

मंदिर परिसराच्या विकासासाठी पावणे दोन कोटी निधी देऊन विकासकामे केली परंतु एका ही कामावर माझा नामोउल्लेख न केल्याची खंत केली व्यक्त

आष्टी प्रतिनीधी : परतूर तालुक्यातील काऱ्हाळा जागृत येथील देवस्थान असलेल्या करळेश्वर मंदिरामध्ये विद्यमान आमदार लोणीकर यांनी दि.21 सोमवार रोजी दुग्धाभिषेक करत पूजा केली. या वेळी सपोनी गणेश सुरवसे,एकनाथ वायाळ, रामदासकाका सोळंके,उध्दव डोळस, दादाभाऊ तोर, उध्दव गुंजाळ,सिध्देश्वर केकान,रवी सोळंके, जिजाभाऊ शिंदे, पवन गुळवे यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थीती होती.

 

प्रसंगी आमदार लोणीकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,गेल्या अनेक वर्षापासुन मी या मंदिरात येऊन या करळेश्वराचा अभिषेक करत असतो, या मंदिराच्या परिसरातील विकासासाठी भरभरून निधी देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो, कारण या करलेश्वर देवस्थानावर माझी खूप मोठी श्रद्धा व भाव असल्याचे त्यांनी सांगितले,यावेळी कार्यक्रमाचे आयोजक गावचे उपसरपंच गणेश सोळंके यांनी या अभिषेक व महापंगतीचे आयोजन केले असून,माझ्यावर जीवापाड प्रेम असणारा हा माझा हडामासाचा सच्चा कार्यकर्ता असल्याने, गणेश सोळंके व त्यांच्या परिवाराने या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतल्याने त्यांचे कौतुक लोणीकर साहेब यांनी केले. या मंदिर सभागृह बांधकाम करण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांच्या मनाने 20 लक्ष रुपये निधी देण्याचा संकल्प ही यावेळी केला.या प्रसंगी बंकटराव सोळंके, बालासाहेब सोळंके,रमेशराव सोळंके, अशोकराव सोळंके,भाऊसाहेब सोळंके, राम सर सोळंके,मदन सोळंके, अनिल सोळंके, रंगनाथराव येवले, दिगांबार येवले, राम येवले, गणेशराव येवले, गोविंद शेळके, गुलाबराव शेळके, विठल सोळंके, लक्ष्मण सोळंके, किशोर सोळंके, विष्णू सोळंके, कल्याण सोळंके, अशोक शेळके, ज्ञानेश्र्वर शेळके,गोविंद सोळंके, गणेश राठोड, बाबुराव खरात, अंकुश जाधव, अमोल सोळंके, महादेव देशमुख, नवनाथ सोळंके,प्रल्हाद सोळंके,यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल