स्वराज्य वार्ता प्रतिनिधी : दिनेश दिलिप सूर्यराव.
शहापूर खर्डी येथे 20 एप्रिल 2024 रोजी कवी संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. या कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून समाजसेवक श्री अशोक वाळू वीर यांची तर विशेष अतिथी तसेच लोकनायक खर्डी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री.दिलीप विनायक अधिकारी (आबा) यांची उपस्थिती लाभली.

श्री.विजय पतंगराव, श्री. जयवंत सरखोत, श्री. फारूक मेमन , श्री. अनंत करंबळेकर, श्री मधुकर मोकाशी, श्रीमती दर्शना पतंगराव यांनी धावती भेट देवून आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघचौरे सर यांनी तर खुमासदार निवेदन श्री प्रकाश पतंगराव यांनी केले. उपस्थीत कवींना आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी श्री. आनंद फुलदास ढाले श्री. सिद्धार्थ मगर श्री.अभिजित वाघचौरे श्री.विठ्ठल बाबुराव घाडी सौ.मोहिनी सतीश कोळी श्रीमती.इंदुमती एन खरात श्री.जयराम कमळू पारधी सौ.वैभवी माने-अय्यर श्री.गजानन गायकवाड श्री.उत्तम कुलकर्णी सर श्री.जयराम मांजरे-पाटील श्री. शिवाजी किसन माळी सौ. रोहिणी श्रीकांत कोठावदे श्री.सुभाष शिंदे श्री. सुनील चंद्रकांत आडोळे सौ.शीतल शिंदे श्री. संतोष रामचंद्र जाधव श्री.रामचंद्र लक्ष्मण भडवलकर सौ.संस्कृती घरत सौ. पूनम मुंडोळे यांनी सहभाग घेऊन हातभर लावला. ह्यावेळी 22 कवींनी उस्फुर्त सहभाग नोंदवून बाप विषयावर बहारदार कविता सादर केल्या.

या काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक – श्री. सुभाष जगन्नाथ शिंदे ,द्वितीय क्रमांक – श्री.जयराम कमळू पारधी तृतीय क्रमांक :- सौ.शीतल शिंदे याचे क्रमांक आले त्यांना सन्मानचिन्ह आणि।प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






