आशुतोष ची प्रकृती अजून चिंताजनक गुंडागिरी वाढली बीलावरून वाद
माजलगावात आठवडाभरात दुसरा खून..
भाजप पदअधिकार्या पाठो पाठ हॉटेल मालकाची हत्या पोलिसांच्या नाकर्तेपणाचा कळस..
स्वराज्य वार्ता / किशन बी पवार
माजलगाव प्रतिनिधी : माजलगाव दिनांक.21.04.2025. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर आठवडाभरात झालेल्या दुसऱ्या खुणामुळे अक्षरशा हा धरून गेले आहे दरम्यान कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसल्याने पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा सिद्ध झाला आहे भाजपा पदाधिकाऱ्याच्या पाठोपाठ हॉटेल मालकाचा खुणा मुळे माजलगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे माजलगाव शहरापासून चार किमी अंतरावर नागडगाव पाटील कॉर्नर वरील गावरान धाबा मालक महादेव गायकवाड वय वर्षे 54 राहणार मंजरथ रोड माजलगाव यांची रविवारी रात्री साडेसात वाजता च्या दरम्यान धाब्यावर बसलेल्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकाने बिलाच्या कारणे डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केला बाबा मालक महादेव गंभीर जखमी झाले होते महादेव गायकवाड यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र उपचार दरम्यान त्यांची प्राणजोत मावळली आशुतोष महादेव गायकवाड त्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या माजलगाव मध्ये एका हॉटेलमध्ये बिल देण्याच्या शिल्लक कारणावरून ग्रहका कडून हॉटेल मालक महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलास बेदम मारहाण करण्यात आली. हा धाबा माजलगाव पाथरी रोडवर नागडगाव पाटी जवळ आहे धाब्यावर रात्री साडेसातच्या सुमारास रोहित शिवाजीराव थावरे आपल्या मित्र सोबत आला होता यावेळी रोहित थावरे चा हॉटेल मालक महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलासोबत बिलाच्या कारणावरून वाद झाला हा वाद इतका इकोपाला गेला की रोहित था वरे आणि त्यांच्या मित्रांनी महादेव गायकवाड यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला महादेव गायकवाड यांच्यावर बीड येथे प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले या ठिकाणी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे प्रेत ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कुटुंबा गायकवाड यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आरोपीवर लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे पोलीस आरोपींना कधी पकडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवनीत कावत यांनी दबंग गिरी दाखवण्याची गरज आहे बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस निरीक्षक नवनीत कावत यांनी माजलगावातील वादाच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे नवनीत का व त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दबंग गिरी असली तरी माजलगाव तील खुनाचे सत्र पोलिसांच्या नाकर्तेपणा कळस आहे त्यामुळे नवनीत कावत यांनी माजलगाव कडे लक्ष घालावे अशी मागणी समस्त माजलगावकरांनी केली आहे.
माजलगाव पोलीस स्टेशन गु.न.144/2025. क्र.108.109..118/2/.352.351./3/3/.189./2/.190.191./2/.191./3/.324./4/.BNS. मधील आरोपी नामे रोहित शिवाजीराव थावरे व इतर पाच सर्व राहणार आनंदगाव तालुका माजलगाव यांना आम्ही लवकरात लवकर अटक करू अशी आश्वासन माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या कुटुंबात दिली आहे पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!