साकळगांव ग्रामपंचायतीचा एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार माहिती अधिकार अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष;

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील साकळगांव येथील ग्रामपंचायत मध्ये २०१५ पासुन ते २०२५ वर्षात १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत ला येणाऱ्या निधीत फार मोठ्या प्रमाणात म्हणजे अंदाजे १ कोटी रुपयांच्या पुढे भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. तसेच मी यापुर्वी दि.०६.१०.२०२३ रोजी ग्रामसेवक यांना माहिती अधिकार अर्जान्वये माहिती मागितलेली आहे. तसेच दि.१२.१२.२०२३ रोजी गट विकास अधिकारी यांना देखील माहिती अधिकार अर्जाव्दारे माहिती मागीतली आहे. तसेच संबधीत ग्रामसेवक यांना माहिती मागीतली तर ते मला माहिती न देता मला उलट धमकावुन माझ्यावर दबाव टाकण्यात आला आहे आमच्या कडे माहिती उपलब्ध नाही असे उडवाउडविचे उत्तर देत आहे. व माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.

मला मौजे साकळगांव ता. घनसावंगी.जि.जालना येथील ग्रामपंचायत मागविलेली माहिती मला 15 दिवसात माहिती दयावी नसता मी आपल्या ग्रामपंचायत कार्यालया समोर उमरण उपोषण करीन यांची नोंद घ्यावी. नसता दि. 25/04/2025 वार शुक्रवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर साकळगांव येथे अमरण उपोषण करणार आहे. याची सविस्तर माहिती मा. जिल्हाधिकारी साहेब, जालना, मा. पोलीस अधिक्षक साहेब, जालना, गट विकास अधिकारी वर्ग-1.प.स.घनसावंगी, मा. तहसिलदार साहेब, घनसावंगी, मा. पोलीस निरीक्षक साहेब घनसावंगी, मा. ग्रामसेवक साहेब / सरपंच ग्रा पं साकळगांव यांना कळवण्यात आले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल