स्वराज्य वार्ता प्रतिनिधी :दिनेश दिलिप सूर्यराव.
शाहपुर तालुक्यातील कोठारे खेडे गावाकडून शहापूर कडे प्रवाश्यांना घेऊन जानाऱ्या बसचा आपघात झाला. गाडीचा ब्रेक फेल झाल्या मुळे गाडी दरीत कोसळून सदर आपघात झाला असून चालक भरत गोसाई वाहक लक्ष्मण जाधव सोबत सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले आसता कोणतीही जीवित हानी झाली नाही.
किरकोळ जखमी झालेल्या चालक ,वाहक व प्रवाश्यांना शहापूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात भरती केले होते. जीर्ण व कालबाह्य बस गाड्या शहापूर बस आगर मधून प्रवास करण्यासाठी वापरत आसुन पुढे ही आसेच अपघात होण्याची शक्यता आहे. शहापूर तालुक्यातील प्रवाशी शहापूर बस डेपोच्या सदर नियोजनावर व कार्य क्षमतेवर संताप व्यक्त करत आहेत.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






