परभणी महानगरपालिकेच्यावतीने मालमत्ता कर व नगररचना विभागाच्या अर्जांसाठी शिबिरे १ ते ७ मे या कालावधीत प्रभागनिहाय शिबीरे शिबिराचा लाभ घेण्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी 

परभणी, दि. १९ — परभणी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परभणी महानगरपालिकेच्यावतीने मालमत्ता कर विभाग व नगररचना विभागाशी संबंधित अर्जांवर तत्पर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने दि. १ मे ते ७ मे २०२५ या कालावधीत प्रभागनिहाय शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, या शिबिरांचे यशस्वीरित्या नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मनपा आयुक्तांना केली आहे. तसेच या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.

परभणी शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे तसेच नगररचना विभागाकडे विविध प्रकारचे अर्ज दाखल होत असतात. त्यामध्ये नागरिकांच्या मालमत्तेच्या क्षेत्रफळाची दुरुस्ती, नागरिकांच्या मालमत्तेचे हस्तांतरण/नामांतरण, नागरिकांच्या मालमत्तेला लागू केलेल्या टॅक्स संदर्भात दुरुस्ती तसेच अतिरिक्त टॅक्स लागू केला असल्यास त्याबाबतची दुरुस्ती इत्यादी स्वरूपाच्या अर्जाचा समावेश असतो. तसेच काही प्रकरणात भूमी अभिलेख विभाग व मनपाचा नगररचना विभाग यांचे अभिप्राय घेऊन अर्जावर तत्पर कार्यवाही करणे वेळोवेळी आवश्यक असते. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध मालमत्तांना शासन निर्देशाप्रमाणे टॅक्स लागू होणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांच्या मालमत्तेला मिळकत कर लागू केल्यास नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होते. त्यामुळे या अर्जांवर वेळेवर आणि प्रभावी निर्णय घेण्यासाठी नियोजित कालावधीत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर शिबिरांमध्ये नागरिकांच्या अर्जांचे परीक्षण करण्यात येणार असून, संबंधित विभागांकडून आवश्यक अभिप्राय घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. ही शिबिरे प्रभागनिहाय आयोजित केली जाणार असून, नागरिकांनी आपल्या प्रभागातील ठिकाणी दिलेल्या दिवशी उपस्थित राहून आपल्या अर्जासंबंधी माहिती व कागदपत्रांसह सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर मार्फत करण्यात आले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल