स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची नुकतीच बैठक शिवसेना कार्यालय परतूर येथे शिवसेना नेते मोहन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. पाटील बोराडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली या आढावा बैठकीसाठी शिवसेना प्रणित सर्व आघाड्याचें कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते मोहन अग्रवाल जिल्हाप्रमुख ए . जे बोराडे बाबासाहेब तेलगड पाटील तालुकाप्रमुख अमोल सुरुंग ,ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तरवटे यांनी मनोगत व्यक्त केली तसेच जिल्हाप्रमुख पाटील यांनी सांगितले की येणाऱ्या काळात होत असलेल्या निवडणुकी साठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे आपापल्या भागातील शिवसेनेची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी तसेच बुथ कमिटी सक्षम करावे ,जो पक्षासाठी वेळ देईल त्यालाच येणाऱ्या निवडणूका मध्ये संधी दिल्या जाईल असेही बोराडे यांनी सांगीतले. बैठकीचे सूत्र संचालन शहर प्रमुख दीपक हिवाळे यांनी केले तर आभार विधानसभा संघटक विजयकुमार गिरी यानी मानले.बैठकीस तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






