राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भारतरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

स्वराज्य वार्ता / किसन बी पवार

माजलगाव प्रतिनिधी :- राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमचे अध्यक्ष मा. कांशीराम साळवे सर उद्घाटक कृउबा सचिव मा. हरिभाऊ सवने प्रमुख व्याख्याते मा. बाळासाहेब सोनसळे सर प्रमुख पाहुणे माजी समाज कल्याण सभापती सौ. अनुसया ताई साळुंके, मा. शिवाजी गायकवाड साहेब मा. सत्यनारायण उनवणे रामप्रभु साळुंके , परळी तालुकाप्रमुख मेघराज कांबळे, जाधव सर व सर्व समाज बांधवांच्या वतीने महापुरुषांचे पुजण करून प्रमुख पाहुण्यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात छोटे मुल श्रेयस ज्ञानेश्वर थेटे व धैर्यशील धनंजय जाधव या दोन मुलाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर खुप सुंदर अस व्याख्यान केले त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रमुख व्याख्याते बाळासाहेब सोनसळे सराने विस्तीर्ण असे मार्गदर्शन केले तसेच जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके,कृउबा सचिव हरिभाऊ सवने साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि अध्यक्षीय भाषण कांशीराम साळवे सर यांनी केले.

सुत्रसंचलन माजी क.जिल्हध्यक्ष अशोक वाडेकर सर यांनी केले तसेच आभारप्रदर्शन माजलगाव तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे यांनी केले.

या जयंतीचे आयोजन युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, सहदेव खंडागळे, पद्माकर कांबळे, दिलीप सोनवणे,अरविंद खंडागळे, संतोष जाधव, सिताराम सोनवणे, योगेश शिंदे,बंडु सोनवणे ,वसंत वाघमारे,संतोष खंडागळे, आकाश कांबळे,अर्जुन पोहेकर, सचिन वाघमारे,मयूर वाघमारे व समाज बांधवांनी सुंदर अस आयोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल