परतुर रेल्वे स्टेशन येथे केले महामानवाला अभिवादन..

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर प्रतिनिधी :- भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती उत्सव सोहळा आर.सी.सी. मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने परतुर रेल्वे स्टेशन येथे साजरा करण्यात आला होता.यावेळी परतुर रेल्वे स्टेशनचे मुख्य स्टेशन अधीक्षक राजेश गुप्ता,आर. पी.एफचे विजय वाघ व सिनिअर बुकिंग क्लार्क संजय गाडगे व झुंगाराम साळवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रामप्रसाद थोरात सर व वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष गौतम खंडागळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नंतर रामप्रसाद थोरात सर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष अशोक ठोके, उपाध्यक्ष राहुल नाटकर, कोषाध्यक्ष दीपक हिवाळे, प्रदीप साळवे , सचिव रवि इंगळे, संघटक स्वप्निल पहाडे, नितीन साळवे, नितीन खरात, रमेश कदम, संतोष कदम, विकास साळवे, गोरख कदम, विजय गायकवाड, संजय गोमाजी गायकवाड, संजय गायकवाड, दिलीप साळवे, दीपक साळवे, मारी साळवे, रोहन अंभोरे, विजय अंभोरे अशोक पाईकराव, सुशांत दवंडे, पत्रकार राज भदर्गे, अशोक दवंडे,विकी बासनवाल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.सूत्र संचालन विकास वेडेकर यांनी केले.सायंकाळी ठीक सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक संविधान चौक रेल्वे स्टेशन परतुर येथून ते तहसील कार्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी जयंतीची सांगता झाली यावेळी आंबेडकरी अनुयायांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. भिंमगीतांच्या तालावार अत्यंत जल्लोषात आंबेडकरी अनुयायी आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीत नाचत होते. या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा “विजय असो”, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है “,वंचित बहुजन आघाडीचा विजय असो”, या घोषणांनी परिश्रम दुमदुमून गेला होता. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष रामचंद्र पानवाले व हेमंत पहाडे यांनी व समता सैनिक दलाने व पोलिसाने सहकार्य केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल