बाबा टावर मधील स्वच्छालयात आढळला मृतदेह.

स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी पाथरी  

पाथरी शहरातील बाबा टॉवर कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या नगरपालिकेच्या सुलभ शौचालयात मंगळवार दिनांक 15 -4 -2025 रोजी दुपारच्या सुमारास एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली या घटनेबाबत अधिक माहिती अशी की शौचालयाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याला एक अज्ञात व्यक्ती स्वच्छतागृहात बेशुद्धावस्थेत दिसल्याने त्याची माहिती तात्काळ पाथरी पोलीस स्टेशनला पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात पाठवून मयताची ओळख पटवली असून मयताचे नाव अनंता हरिभाऊ टोम्पे वय 40 वर्ष राहणार शिक्षक कॉलनी पाथरी हल्ली मुक्काम बिहार कॉलनी मानवत असे आहे.

फिर्यादी रूपाली अनंता टोम्पे वय 28 वर्ष राहणार शिक्षक कॉलनी पाथरी हल्ली मुक्काम बिहार कॉलनी मानवत यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) भारत वाव्हळे २) राहुल शिंदे ३) अशोक खंडागळे सर्व राहणार पाथरी यांनी संगणमत करून फिर्यादीचे पती अनंता यास संगणमत करून मयताकडील पैसे त्यांनी परत दिले नाही या कारणावरून अनंता हरिभाऊ टोम्पे वय४० यांना राहत्या घरातून बोलावून बाहेर कुठेतरी गंभीर मारहाण करत जीवे मारून पाथरी शहरातील बाबा टावर परिसरातील नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालय येथे आणून टाकले अशा आशयाची फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गु.र.न.१९७/२५कलम १०३(१)३(५)भा. न्या.संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनास्थळाला एस डी पी ओ सेलू समाधान पाटील पोलीस निरीक्षक महेश लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, घायवट ,सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी करत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल