कला दिन.

 कला दिन. एक असा दिवस, ज्या दिवशी कला तिच्या साऱ्या रूपांतून साकार होते —
कधी रंगांच्या उधळणीतून,
कधी शब्दांच्या गूढ अर्थांतून,
तर कधी नादांच्या, तालांच्या लयीतून.
नृत्य —
ज्याच्या एका पदन्यासात भाव उमटतात,
जिथे देह बोलतो, आणि आत्मा साद घालतो.
चित्रकला —
जिथे रंगांच्या छायेतून जीवन उभं राहतं,
जिथे प्रत्येक ब्रशचा स्पर्श एक गोष्ट सांगतो.
संगीत —
जे शब्दाशिवाय भावना व्यक्त करतं,
जे मनाच्या अगदी खोल कप्यात जाऊन स्पर्श करतं.
काव्य —
मनाच्या गूढ तळातून उमटलेली जादू,
जिच्या ओळी अंतर्मनाला भिडतात.
या सगळ्या कला आपल्यात आहे, आपल्या भोवती आहे.
कलादिन म्हणजे या सर्जनशीलतेला वंदन,
त्या कलाकारांना सलाम,
जे जगाला वेगळ्या दृष्टीने पाहण्याचं भान देतात.
चला, या कलांचा उत्सव साजरा करूया…
हृदयाशी जपलेली सृजनशक्ती जागवूया!
“कलादिनाच्या तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”
तुमच्यात हि कोणती कला आहे. नक्कीच कंमेंट करून कळवा.
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल