डाॅ.बाबासाहेआंबेडकर हे राज्य घटनेचे शिल्पकार — सलीम इनामदार 

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

परभणी (जि प्र) शिक्षण क्षेत्र हेच परिवर्तनाचे शस्त्र समजून शिका संघटीत व्हा संघर्ष करुनच माणूस हे स्वता:ची ओळख निर्माण करु शकतो व जात धर्म लिंग या पेक्षा माणूस हि ओळख महत्वाची आसुन सामाजिक परिवर्तनाची भुमीका व अस्पृश्योद्धारा बरोबरच देशातील तमाम शोषीत -पिडीत वर्गासाठी सर्वाना सामाजिक न्याय सर्वांचा समान विकास व सर्वाना समान अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न शील असल्यानेच डाॅ.बाबासाहेआंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार होते असे प्रतिपादन लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी जयंती निमित्त महावितरण कंपनी झोन क्रमांक तीन येथे व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष सथानी झोन क्रमांक तीन चे कनिष्ठ अभियंता रवि मुळे हे होते तर अभियंता मुळे यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला प्रेरणादायक होते असे सांगितले पुढे बोलतांना सलीम इनामदार यांनी आंबेडकर यांच्या नावाचे देशात सोळा विद्यापीठे पैकी महाराष्ट्रात दोन विद्यापीठ व शेकडो महाविद्यालय आज रोजी कार्यरत असून कोट्यावधी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व राष्ट्राच्या जनतेच्या भल्याचा विचार करूनच निर्णय नेते मंडळीनी घ्यावे असे बाबासाहेबाना वाटत होते व त्यांना निवडून आणण्यात या देशातील मुस्लिम बांधवाचा सिंहाचा वाटा होता असेही इनामदार यांनी सांगीतले महावितरण कंपनी च्या कार्याल्या त महामानवाची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनोहर पांचाळ आशोक कच्छवे विनोद गायकवाड किशोर गायकवाड अमीर पठाण गोविंद कुलकर्णी शेख शफी अब्दुल शफी कपील पैठणे विशाल अंबटी राहुल पारपल्ली दत्तराव, कळसे जोधंळे जुकटे महोमद गौस मेकानिक सय्यद मुजाहेद शेख फेरोज याच्यांसह अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थितीत होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल