श्रीमती सुनीता संतोष रनबावळे यांचे प्रतिपादन सरस्वती फाऊंडेशन च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…!

स्वराज्य वार्ता / परतूर प्रतीनिधी

तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात समतेचा सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी सरस्वती फाऊंडेशन गरजवंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यासाठी कटिबद्ध असेल असे प्रतिपादन
सरस्वती फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता संतोष रनबावळे यांनी केले. परतूर येथे सरस्वती फाऊंडेशन च्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरस्वती फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता संतोष रनबावळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या दरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी नागोराव सूर्यवंशी,संतोष रनबावळे,गजानन सूर्यवंशी,आनंद गजभारे, गणेश गजभारे,आदित्य गजभारे,उदय रनबावळे, श्रीमती प्रयागबाई सूर्यवंशी, विद्या रनबावळे,संगीता सूर्यवंशी,आशा सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्रीमती सुनीता रनबावळे म्हंटल्या की,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे.समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विचार प्रवाहांना सुयोग्य वळण मिळवून देण्याचे काम शिक्षणाचे आहे.या अनुषंगाने गरजवंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता सरस्वती फाऊंडेशन शिक्षण क्षेत्रात कर्तव्यदक्षतेने कार्य करेल.

समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांचा सामाजिक शैक्षणिक,सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या सर्वांगीण विकास साधावा याकरीता शासनस्तरीय विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजवंत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती फाऊंडेशन कायम कटिबद्ध असेल.असे श्रीमती मत सुनीता रनबावळे यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल