उल्हास नगर वाहतूक शाखेची रिक्षा चालक मालक संघटनेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक दिवसीय मार्गदर्शन सभा व चर्चासत्र..

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी : दिनेश दिलिप सूर्यराव.

उल्हास नगर वाहतूक शाखेचे (ACP) मा.विजय पोवार साहेब , मा.सुखदेव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० एप्रिल २०२५ रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उल्हास नगर ( ACP) कार्यालय येथील मा.विजय पोवार यांनी रिक्षा चालक मालक यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रिक्षा युनियनच्या पदाधिकारी यांचे दुपारी १ वाजता सभेचे आयोजन केले असता अंबरनाथ, उल्हास नगर, विठ्ठल वाडी , बदलापूर अशा विविध शहरातील रिक्षा युनियन तसेच रिक्षा चालक मालक यांच्या समस्या सोडविण्या बाबत चर्चा करते वेळी प्रमुख मुद्दे उपस्थित झाले १) रिक्षा संघटनांना कायदेशीर मान्यता प्राप्त रिक्षा स्टँड उपलब्ध करून देणे. (२) स्टँड सोडून प्रवासी भाडे घेणार्या रिक्षांवर कायमस्वरूपी बंदोबस्ताची कारवाई करणे.(३) अंबरनाथ तालुका पूर्व आणि पश्चिम दोन्ही ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करणे (४) अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम दोन्ही ठिकाणी बिना लायसन्स बॅच प्रवासी भाडे घेणार्या रिक्षा जमा करणे.(५) अंबरनाथ पूर्व भागातील बाईक पार्किंग वेल्फेअर सेंटरच्या रिकाम्या जागेत करणे तसेच दुकानदारांच्या समोर जाळ्या ठेवून केलेला कब्जा हटविणे अशा प्रकारे विविध प्रश्नांवर रोखठोक चर्चा झाली असता (ACP ) मा.विजय पोवार साहेब आणि सुखदेव पाटील साहेब यांनी रिक्षा युनियन यांना कायदेशीर उपाययोजना करण्यात येईल असा शब्द दिला मिटिंगमध्ये उपस्थित असणाऱ्या संघटना आणि पदाधिकारी (१) रयत वाहतूक संघटनेचे अंबरनाथ अंबरनाथ तालुका अध्यक्ष आशिष देशपांडे, (२) कै.जोशी काका रामदास पाटील संघटनेचे तालुका उपाध्यक्ष दिलीप पाटील, शहर सेक्रेटरी रमेश डेरे , शहर खजिनदार नारायण कोळी, स्टँड प्रमुख पप्पू यादव (३) उल्हास नगर शहर कमेटी बहादुर कतोरीया या सर्वांन सह रिक्षा चालक मालक प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल