जनसेवक भुमीकेतून आमदार विटेकर यांचा आभार दौरा. गुरूवारी पाथरी तालुक्यातील १२ गावांना दिल्या भेटी.

जनसेवक भुमीकेतून आभार दौऱ्यानिमित्त आमदार राजेशदादा विटेकर यांनी गुरूवारी पाथरी तालुक्यातील खेर्डा येथे ग्रामस्थांनी संवाद साधला.यावेळी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, जि.प.माजी सभापती दादासाहेब टेंगसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजिंक्य नखाते,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष कोल्हे,भास्कर डुकरे, विठ्ठल थोरात, अक्षय शेळके,संतोष चव्हाण आदी..

पाथरी (वार्ताहर) : अहमद अन्सारी पाथरी

निवडून आलेला आमदार हा जनसेवक असतो या भुमीकेतून नागरीकांमध्ये जाऊन त्यांचे समस्या जाणून घेणे व सोडवणे साठी आमदार राजेशदादा विटेकर यांनी मतदार संघात आभार दौरा सुरू केला.दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी पाथरी तालुक्यातील १२ गावांना भेट देऊन त्यांनी समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी मि कटिबद्ध आहे असे सांगितले आहे.   गुरूवारी सकाळी ९ वा.आ.राजेशदादा विटेकर यांनी खेर्डा येथे भेट दिली.यावेळी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, जि.प.माजी सभापती दादासाहेब टेंगसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजिंक्य नखाते,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष कोल्हे,भास्कर डुकरे, विठ्ठल थोरात, अक्षय शेळके,संतोष चव्हाण यांची उपस्थिती होती.यावेळी आ.विटेकर यांनी थेट नागरीकांशी संवाद साधत गावातील अंतर्गत रस्ते,पिण्याचे पाणी,दिवाबत्ती,शेती कर्ज प्रकरणे याशिवाय विकास कामाची आवश्यक असलेल्या कामाबाबत त्यांनी चर्चा केली.दिवसभरात सारोळा,वडी, निवळी,पाटोदा, गोपेगाव, मरडसगाव,बाणेगाव,मंजरथ,नाथरा,पाथरगव्हाण या या गावांना भेटी देत सायंकाळी ८ वा.कासापुरी येथे समारोप केला.  आ.राजेशदादा विटेकर यांनी विधीमंडळात लक्षवेधी माध्यमातून शेतकरी पिक विमा अतिशय योग्य पध्दतीने मांडला आणि राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.याशिवाय जात प्रमाणपत्र वैधता नसल्याने अपात्र ठरलेल्या ग्राम पंचायत सदस्य यांचे बाबत आ.विटेकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा केली आणि जात वैधतेसाठी एक वर्षे मुदतवाढ मिळवून दिली.या कामगीरीबद्दल आ.विटेकर यांच्या विषयी नागरीकांमध्ये समस्या सोडवणे आणि विकासकामे करणे अशाआकांक्षा वाढत आहेत. त्याच दृष्टीने आ.विटेकर यांनी जनसेवक म्हणून नागरीकांमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानने, त्यांचेशी संवाद साधण्यास प्राधान्य दिले आहे हि बाब विकासासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे.या दौऱ्यात चेअरमन, सरपंच,उपरसपंच,ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे सदस्य यांचेसह युवकांचा मोठा प्रतिसाद होता.

तिर्थक्षेत्राचा सुक्ष्म विकास नियोजन आराखडा.   सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष,विधान परिषद सदस्य आणि त्यानंतर विधानसभा सभा आमदार असा प्रदिर्घ अनुभवातून आ.विटेकर यांनी सुक्ष्म नियोजन सुरू केले आहे. त्यांनी मागील आठवड्यात अधिकारी, कर्मचारी समवेत मतदार संघातील तिर्थक्षेत्र दौरा केला.यामध्ये प्रत्यक्ष जागेचे मोजमाप आणि तेथे प्रत्येक्ष भौतिक सुविधा यांची माहीती घेऊन येथे आवश्यक विकास कामाची यादी केली.यापुढे तिर्थक्षेत्र विकासासाठी मि व जो कोणी निधी देईल तो आवश्यक कामासाठीच अनुज्ञेय होईल अशा प्रकरचा आ.विटेकर यांनी केलेला आराखडा आगामी विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल