विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबीनारव्दारे संवाद ११ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत संवाद परभणी जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

परभणी, दि. 10/04(2025. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात, मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारव्दारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ येत्या ११ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत विभागीय आयुक्त श्री. गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या संकल्पनेतून एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमाची सुरुवात झाली आणि संपूर्ण प्रशासन थेट गावात पोचले. या उपक्रमाच्या यशानंतर विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे प्रशासकीय कामानिमित येण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारव्दारे संवाद या उपक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत विभागीय आयुक्त श्री. गावडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत संवाद साधणार आहेत.

श्री. गावडे यांच्यासमवेत यावेळी विभागीय पातळीवरील प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असणार आहेत. प्रत्येक आठवडयात दर बुधवारी ४ ते ६ यावेळेत आयुक्त नागरिकांशी संवाद साधतील. प्रत्येक संवादावेळी प्रशासकीय विभाग व विषय ठरविण्यात येणार असून यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित विषयावर विभागीय आयुक्त श्री. गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

नागरिकांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणीबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधता येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे अवाहन विभागीय उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले आहे.

याबाबतचा क्युआर कोडही प्रसिदध करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे, या अभिनयात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल