सेलूला राज्यातील प्रथम सौर सिटी बनविणार पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे महावितरणचा सेलू विभाग नव्याने कार्यान्वीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी  

सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्येक घरी लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना शहराला राज्यातील पहिले सौर सिटी बनवणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते आज नव्याने कार्यान्वीत झालेल्या महावितरण सेलू विभागाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यकारी संचालक प्रकल्प धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ राजाराम माने, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय रुपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता (सेलू) उमेश धोंगडे, अभियंता मंदार वग्यानी उपस्थित होते.

ग्राहकांच्या सेवा तसेच प्रशासकिय सोयीकरिता परभणी विभाग क्र.1 व 2 ची पुनर्रचना करून परभणी विभाग व सेलू विभाग असे बदल करण्यात आले व परभणी विभाग क्र.2 चे मुख्यालय सेलू येथे स्थलांतरीत करून नव्याने सेलू विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

सेलू येथे १३२ केव्ही मंजूर झाले होते पण येथील अधिका-यांनी १३२ केव्हीची आवश्यकता नसल्याचा अहवाल पाठवला होता. असा अहवाल पाठविणारावर कारवाई होणार असल्याचे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर -साकोरे यांनी सांगितले. सेलू येथून कापसाच्या गाठीसह इतर वस्तूंचा व्यापार होतो. त्यामुळे येथे १३२ केव्हीची आवश्यकता आहे. गतिमान सरकारच्या टँगलाईननुसार वीज देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे. ते काम तत्परेतेने झाले पाहीजे. सेलू शहर राज्यातील पहिले सौर शहर बनवायचे आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घरोघरी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मतदारसंघात ५० हजारावर नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे. सर्वांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल