प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
परभणी, दि. 09/04/2025. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालय सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑफिस आणि संकेतस्थळ सुरक्षा या विषयांवर प्रशिक्षण संपन्न झाले.

या कार्यक्रमाची सुरुवात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी मोहिमेचे उद्दिष्ट आणि कार्यक्रमाची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. यानंतर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची व गुणांकन पद्धतीची माहिती दिली.

जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संकेतस्थळ सुरक्षा (Cyber Security) यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक कपिल पेंडलवार यांनी ई-ऑफिस प्रणालीवर प्रशिक्षण दिले, तर नायब तहसीलदार शितल कचवे यांनी ‘रचना व कार्यपद्धती – सहा गटपद्धती’ या विषयावर माहिती दिली.

तहसीलदार, पूर्णा माधवराव बोथीकर यांनी महसूल विषयक बाबी आणि पांदण रस्त्यांबाबत प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार (महसूल) ज्योती पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






