अंबरनाथ पूर्व भागात रस्ते व फुटपाथवर अनाधिकृत पणे कब्जा नगरपालिका प्रशासनाचा अर्थपूर्ण कानाडोळा.

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी : दिनेश दिलिप सूर्यराव

अंबरनाथ तालुका पूर्व भागातील फुटपाथवर तसेच रस्त्यांच्या दुतर्फा भागातील परप्रांतीयांच्या हातगाड्या, फेरीवाले, दुकानदार यांचे कब्जे दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यावर अनाधिकृत बाइक पार्किंग करून पैसे वसूल केले जातात.

अंबरनाथ नगरपालिकेने नागरिकांन कडून रोड टॅक्स वसूल करायचा आणि नागरिकांना साधा फुटपाथ सुद्धा देऊ न शकणारी अंबरनाथ नगरपालिका कारणीभूत ठरत असून अतिक्रमण विभाग कानाडोळा करत असल्याची नागरिकांना मध्ये ओरड आहे.

तसेच जनता वाईन आणि देशी दारूच्या दुकाना समोरील पार्किंग झोनच्या संरक्षण भिंतीला लागून असेलल्या चायनीज हातगाड्या तसेच बिल्डरचे रस्तावर पडलेले मटेरियल या मुळे नागरिकांना येण्या जाण्यास नाहक त्रास होत आहे. रस्त्यावरील पार्कींग व विक्रेत्यांचा कब्जा मुळे वाहतूक कोंडी होते तसेच जनतेस फुटपाथ वरून चालण्यास आडथले निर्माण होत आहे.

खुलेआम केलेला कब्जा तसेच पार्कींग चा ठेका कोणाला दिला आहे. या विषयी 03/04/2025/ रोजी अंबरनाथ तालुका पूर्व भागातील रस्ते व फुटपाथ मोकळे व्हावेत या उद्देशाने अंबरनाथ नगरपालिका येथे माहिती अधिकार 2005 अन्वये माहिती घेण्यासाठी पत्रव्यवहार केला असून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अंबरनाथ तालुका अध्यक्ष आशिष देशपांडे यांच्या अंतर्गत लेटर देण्यात आले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल