आ. बबनराव लोणीकर साधणार उद्या आष्टीत ग्रामस्थांशी संवाद

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

आष्टी प्रतिनिधी : परतुर तालुक्यातील आष्टी येथे येथे बुधवारी दि. 9 रोजी सकाळी 10 वाजता एक दिवशीय ग्रामस्थांशी म्हणजेच जनता दरबार कार्यक्रम आयोजित गावातील सिद्धेश्वर मंदिर मध्ये करण्यात आला आहे. या कार्यक्रमास आ. बबनराव लोणीकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत उदयसिंग राजपूत, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच जिल्ह्याचे इतर विभाग प्रमुख तालुक्याचे सर्व विभाग प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने तरी सर्व नागरिकांनी सकाळी 10 वाजता सिद्धेश्वर मंदिरात उपस्थित राहण्याचे आव्हान आष्टी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी डी.बी काळे, सरपंच शोभा चंद्रकांत मोरे, उपसरपंच नसरूल्ला काकड, मधुकर मोरे यांनी केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल