परतुरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यासह शालार्थ समन्वयकाचे अखेर निलंबन शिक्षकांच्या आयकराचे १ कोटी ३४ लाख हडपणे आले अंगलट

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

परतूर प्रतिनिधी शिक्षकांच्या पगारातुन कपात होणारी आयकराची रक्कम गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यावरुन परस्पर स्वतःच्या खात्यावर वर्ग करणारा शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ याच्यासह याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांना निलंबीत करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, परतूर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातंर्गत कार्यरत विविध शाळांमधील शिक्षकांच्या पगारातुन कपात केली जाणारी आयकराची रक्कम गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांच्या खात्यात जमा होते. हे काम परतुर येथीलय जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे सहशिक्षक तथा शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ याच्याकडे होते. मात्र, त्याने गटशिक्षणाधिकारी श्री. साबळे यांच्या बँक खात्यातून १ कोटी ३४ लाख ४५ हजार ४३८ रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग केले होते. या गैरप्रकाराचा भांडाफोड होताच पौळ याने स्वतःच्या खात्यावर वर्ग केलेल्या रकमेपैकी काही रक्कम गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केली. मात्र, त्याच्याकडे अद्यापही ५० लाख रुपये बाकी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या अपहाराची चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणियार यांनी गंभीर दखल घेतली असून, चंद्रकांत पौळ याच्यासह अपहाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे गटशिक्षणाधिकारी श्री. साबळे यांना निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर याप्रकरणी या दोघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सुचनाही श्री. मिनियार यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांना दिल्या आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल