प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
रेणाखळी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखेचा उद्घाटन समारंभ.
पाथरी (वार्ताहर) : निवडणूक संपली ,मि निवडुण आलो आता मि पाथरी विधानसभेतील प्रत्येक नागरीकांचा हक्काचा आमदार आहे.माझेकडे आलेल्या प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्यासाठी मि सदैव कटिबद्ध आहे असा विश्वास आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केला.
गाव तेथे शाखा या मोहीमेअंतर्गत पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखेचे ३ एप्रिल रोजी आमदार राजेश विटेकर यांचे हस्ते उद्दघाटन झाले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते,जि.प.माजी सभापती दादासाहेब टेंगसे,माधवराव जोगदंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य नखाते,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, गणेशराव दुगाणे रायुकाँचे विधानसभा अध्यक्ष शिवाजी कदम यांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना आ.विटेकर म्हणाले की,शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, निराधार यांच्या समस्या सोडविण्यासाठी मि सदैव तत्पर आहे. याशिवाय विकासकामाचा अनुशेष भरुण काढण्यासाठी मि कृती आराखडा तयार केला असुन त्याची आंमलबजाणी सुरू केली आहे.युवकांनी सामाजीक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सभापती अनिलराव नखाते बोलतांना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आ.राजेश विटेकर यांच्या सहकार्यातून सार्वजनिक व वैयक्तिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार असे सांगितले, त्यानंतर शेख अल्लीमोद्दीन, केशव इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात नुतन शाखाध्यक्ष पांडुरंग हारकळ,उपाध्यक्ष कृष्णा देपाळे,सचिव विकास हारकळ,सहसचिव शेख राजु,कोषाध्यक्ष संतोष शिंदे यांचेसह सदस्यांचा आ.राजेश विटेकर यांनी सत्कार केला. प्रास्ताविक प्रकाश हारकळ यांनी केले तर सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी केले.
▪️पिकविमा चा प्रश्न सोडवल्याबद्दल आ.विटेकर यांचा सत्कार.
निसर्गाचा असमतोल व शेतकऱ्यांची आर्थिक समस्या लक्षात घेऊन पिक विमा रक्कम बाबत आ.राजेश विटेकर यांनी विधानभवनात लक्षवेधी मांडली आणि राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला, याशिवाय शेतकऱ्यांची गैरसोय दुर व्हावी यासाठी प्रत्येक गावात तलाठी भवन व मंडळ अधिकारी भवन हा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ.राजेशदादा विटेकर यांचा सत्कार केला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






