प्रतिनिधी. दिनेश दिलिप सूर्यराव.
मुरबाड तालुक्यातील कुडवली गावचे सरपंच रामचंद्र मालू सासे यांची मुलगी गीतिका रामचंद्र सासे नुकतच एम.बी.बी.एस.च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे.या तिच्या उज्वल यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च उरण, इस्लामपूर, सांगली महाविद्यालयातून ती एम.बी.बी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.२०२० ते २०२४ या कालावधीतील तिने हे शिक्षण पूर्ण केले आहे. पहिल्याच प्रयत्नात आणि प्रथम श्रेणीमध्ये ६३ टक्के गुण प्राप्त करून एम.बी.बी.एस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल नुकतच भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने गीतिका रामचंद्र सासे यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून गीतीका रामचंद्र सासे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






