प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
मानवत : येथील PMSHRI जि.प.के.प्रा.शा. मानवत विद्यालयाचे आठ विद्यार्थी एनएनएमएस व छत्रपती शाहू महाराज सारथी या परीक्षेत आठ विद्यार्थी पात्र ठरले. एनएनएमएसमध्ये
1) पल्लवी अभय दहे. 2) वैष्णवी नारायण हारकळ 3) ऋतुजा मारुती काळे 4) तेजस्विनी संजय प्रधान 5) अंजली मारोती गायकवाड 6) अंजली बालाजी पांचाळ 7) गायत्री तुकाराम चव्हाण 8) समर्थ शाम दगडू
हे आठवीचे विध्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यास पुढील 5 वर्षे शिक्षणासाठी वार्षिक 12 हजार अशी एकुण 60,000/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यालयाचे 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रत्येक विद्यार्थ्यास पुढील 4 वर्षे शिक्षणासाठी वार्षिक 9600 हजार अशी एकुण 38,400/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
1) गायत्री घुमरे
2) वैष्णवी मस्के
3) श्रध्दा काळे
4) शिवम मोरे
5) वैष्णवी पवार
6) कार्तिकी कबले
7)ओमकार हिंगण
8) स्वराज भोरकडे.
हे उत्तीर्ण झाले. यशस्वीतांना शिक्षक श्री.संजय पकवाने व कर्णराज दुधाळ सर यांचे मार्गदर्शन मिळाले. या विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा .श्री. मोहन भाऊ लाड व उपाध्यक्षा राणीताई गोलाईत व सर्व सन्माननीय सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






