रेणाखळीची पुनम इंगळे एन.एम.एम.एस.परिक्षेत जिल्ह्यात पहीली;

पाथरी प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी 

पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रेणाखळी पिएमश्री जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कु.पुनम उध्दव इंगळे ही एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत मुलींमधून परभणी जिल्ह्यातून पहिली आली असून सर्व साधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात तिसरी आली असुन शाळेचे तिच्यासह पाच विद्यार्थी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे.

पुनम उध्दव इंगळे, वैष्णवी अर्जुन इंगळे, आकांक्षा भागवत हारकळ, अरविंद परमेश्वर ताल्डे,फैजान मोबिन शेख ह्या सदरील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील असल्याने शाळे व्यतिरिक्त कसलेही क्लास, शिकवणी न लावता शिक्षकांनी शाळेतच घेतलेल्या विशेष परिश्रमातुन सदरील यश संपादन केले.पुनम ही नवराष्ट्र पत्रकार तथा माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव इंगळे यांची मुलगी आहे.

तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

त्यांना मार्गदर्शन करणारे निलु पवार सर ,विकास मामीलवाड सर , चारुदत्त भामरे, संतोष बाबळे, वर्ग शिक्षक वैजीनाथ गिरी सर, शेख अन्वर सर, बालासाहेब तुरे सर व शारदा गजमल मॅडम, दत्ता गाढवे सर संकेत कांबळे सर सौ सुषमा साबळे मॅडम ,हनुमंत सिरसे सर मुख्याध्यापक रमेश तांबोळी सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले या सर्वांचे पालकवर्गा कडुन व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभावती परमेश्वर हारकळ व रेणाखळी गावचे सरपंच राहुल ब्रह्मराक्षे व ग्रामपंचायत व एसएमसी सदस्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षापासून रेणाखळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरत असून प्रत्येक वर्षी येथील विद्यार्थी सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल