जालन्यात सुनेनं सासूचा खून करून मृतदेह भरला पोत्यात घर मालकाच्या निदर्शनास येताच पोलिसांना केला फोन 

स्वराज्य वार्ता/ राम राठोड 

जालन्यात सुनेनं सासूचा खून करून मृतदेह भरला पोत्यात घर मालकाच्या निदर्शनास येताच पोलिसांना केला फोन मृतदेह टाकून सुन फरार पोलिसांचे पथक फरार सुनेच्या मागावर आहे.

जालना: शहरातील भोकरदन नाका येथे सुनेने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सविता संजय शिनगारे (४५) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितल्या नुसार, प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता शिनगारे या सून प्रतीक्षा शिनगारे यांच्यासोबत किरायच्या घरात राहत. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने घरी सासू आणि सून दोघीच होत्या. कौटुंबिक वादातून बुधवारी पहाटे सुनेने सासूच्या डोक्यात जोरदार वार केला. यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतिक्षाने मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला. मात्र, घर मालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत प्रतीक्षा मृतदेह सोडून फरार झाली.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, एलसीबीचे पोनि. पंकज जाधव, सदरबाजार पोलिस ठाण्याचे पोनि. संदीप भारती व इतरांनी भेट देवून पाहणी केली.

मृतदेह विल्हेवाट लावण्याचा होता हेतू

सून प्रतीक्षा यांनी सासू मृत्युमुखी पडल्याचे पाहताच मृतदेह पोत्यात भरला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने पोते घराच्या बाहेर काढत असताना प्रतिक्षाला घर मालकाने पाहिले. पोते अवजड असल्याने प्रतिक्षाला ते बाहेर नेता आले नाही. यातच घर मालकाला संशय आल्याचे लक्षात येताच प्रतीक्षा तेथून फरार झाली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे फुटेज घेतले आहेत. आरोपीच्या शोधार्थ एलसीबी आणि सदरबाजार पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल